Maharashtra political crisis: उद्धव ठाकरेंनी केली बाळासाहेबांची कॉपी पण...

author img

By

Published : Jun 23, 2022, 5:57 PM IST

Updated : Jun 23, 2022, 7:26 PM IST

Uddhav Thackeray

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत (Maharashtra political crisis) आले आहे. त्याच बरोबर शिवसेनेच्या भवितव्या बद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 30 वर्षापुर्वी म्हणजे 1992 मधे अशाच एका प्रसंगात स्वत: बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray) यांनीही भावणात्मक मुद्यावर शिवसेनेच्या अस्तित्वावरील संकट टाळले होते. यावेळी उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांची काॅपी केली पण... (Uddhav Thackeray made a copy of Balasaheb but) यावेळी शिवसेनेवरील संकटाचे काय होणार हे पाहणे आौत्सुक्याचे राहणार आहे.

हैदराबाद: मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांचा एक मोठा गट फोडत महाराष्ट्र सोडला. तेव्हा पासुन महाराष्ट्रात राजकीय भुकंप आला आहे. महाविकास आघाडी सरकार तर अडचणीत आलेच आहे. पण त्या सोबत शिवसेनेच्या अस्तीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 1992 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पण अशाच घटनेचा मोठ्या शिताफीने सामना केला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला त्या संकटातुन शिताफीने बाहेर काढले होते. शिवसेनेत असे अनेक वादळे आली पण शिवसेनेने त्यांचा सामना केला. यावेळी पुन्हा शिवसेने समोर मोठे संकट उभा राहिले आहे.

उध्दव ठाकरेंची भावणीक साद: दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि बाळासाहेबांनी ज्या प्रमाणे 1992 मधे भावणीक साद घातली होती तशीच साद घातली. त्यांच्यासाठी पक्ष ही प्राथमीकता आहे मुख्यमंत्री पद नाही. आणि ते सोडण्याची तयारीही त्यांनी जाहिरपणे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात वापस येऊन बोला असे आवाहन केले. उध्दव यांच्या आवाहना नंतरही शिवसेनेच्या आमदारांचा शिंदें कडे जाण्याचा ओघ कमी झालेला नाही. दोन दिवसात शिवसेनेचे आणखी 7 आमदार शिंदेच्या गटात सामील झाले.

काय म्हणाले होते बाळासाहेब: शिवसेनेने आत्तापर्यंत अनेक बंडखोरी पाहिल्या आहेत.1992 मधे बाळासाहेबांचे सहकारी माधव देशपांडे यांनी शिवसेनेवर असेच आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी उध्दव आणि राज ठाकरे यांच्या पक्षातील हस्तक्षेपाचा मुद्दा उचलला होता. त्यावेळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात बाळासाहेबांनी लेख लीहीला होता. त्या लेखात बाळासाहेबांनी म्हणले होते की, जर कोणी माझ्या समोर येऊन मला अडचण सांगितली ठाकरे घराण्यामुळे पक्ष सोडला असेल तर त्या वेळी मी पक्षाचे प्रमुख पद सोडुन देईन. मीच नाही तर माझे सगळे कुटुंब शिवसेना सोडेल

शिवसैनिक उतरले होते रस्त्यावर: बाळासाहेबांचा लेख वाचून शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. मातोश्री बाहेरही मोठा जमाव जमला. आणि शिवसेनेतील पदाधिकारी आणि सगळ्यांचेच बाळासाहेबांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. देशपांडे यांनी केलेले सगळे आरोप बाजुला पडले. आणि हे वादळ थांबले. उध्दव ठाकरेंनी त्याच पध्दतीने त्यावेळच्या भावणीक आवाहनाची काॅपी करत मुख्यमंत्री पदा सह शिवसेनेचे कार्याध्यक्षपदही सोडण्याची तयारी दाखवली. आणि घोषने नंतर काही वेळात शासकीय निवासस्थान सोडत मातोश्रीवर बस्तान हालवले. यावेळी ही गर्दी झाली शिवसैनिक वर्षा आणि मातोश्री परीसरात जमले पण त्यावेळ सारखा प्रभाव दिसला नाही.

काय म्हणाले उध्दव ठाकरे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि त्यांनी शिवसेनेला दिलेल्या थेट आव्हानानंतर पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली. तुम्हाला माझ्या विषयी जर अडचण असेल तर मला हेच सांगायला हवे होते. मी माझा राजीनामा स्वतःहून दिला असता इतकेच काय जर पक्षप्रमुख म्हणूनही जर माझी अडचण वाटत असेल तर मी दोन्ही पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही समोर येऊन सांगा मी पद सोडायला तयार आहे असे आवाहन उद्धव यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांना केले.

बंडखोरी नवी नाही: शिवसेनेला बंडखोरी नवी नाही.या पुर्वी पक्षाचे 4 वजनदार नेत्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केलेला आहे. शिवसेनेला पहिला धक्का ओबीसी नेता अशी ओळख असलेल्या छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यांच्या सोबत 18 आमदार होते पण त्याच दिवशी त्यांतील 12 आमदार शिवसेनेत परतले होते. 2005 मधे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पक्ष सोडुून काॅंग्रेसमधे प्रवेश केला. सध्या ते भाजप मधे केंद्रिय मंत्री आहेत. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी पक्ष सोडला.आणि स्वत:चा नवा पक्ष काढला. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड पहायला मिळत आहे.

हेही वाचा : Sanjay Raut Appeal to Eknath Shinde : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा - राऊतांचे शिंदेंना आवाहन

Last Updated :Jun 23, 2022, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.