मोदी सरकारचा मोठा निर्णय; सेतू सुविधा केंद्रांमध्ये रेशनकार्डाशी संबंधित सेवा मिळणार!

author img

By

Published : Sep 22, 2021, 3:07 PM IST

Updated : Sep 22, 2021, 3:38 PM IST

रेशन कार्ड सेवा

सीएससी ई-गव्हर्नस सर्व्हिसेस इंडियाचे महासंचालक दिनेश त्यागी म्हणाले, की अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाबरोबर आम्ही भागीदारी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, त्या लोकांपर्यंत सीएससीद्वारे पोहोचणे शक्य होणार आहे.

नवी दिल्ली - नागरिकांना रेशनकार्डाशी संबंधित कामासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही. कारण, देशातील 3.7 लाखांहून अधिक सेतू सेवा केंद्रांवर (सीएससी) रेशन कार्डाच्या सेवा मिळणार आहेत. यामध्ये नवीन रेशन कार्डासाठी अर्ज करण्यापासून विविध सेवांचा समावेश आहे.

रेशन कार्डाच्या विविध सेवा सेतू सुविधा केंद्रांवर सुरू होणार असल्याने 23.64 कोटी रेशनकार्डधारकांचा फायदा होणार आहे. अन्न व सार्वजनिक वाहतूक विभागाने इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या सीएससी ई-गव्हर्नस सर्व्हिसेस इंडिया लि. कंपनीबरोबर केला आहे. ग्रामीण आणि निम्नशहरी भागांमधील रेशनकार्डधारकांना रेशन पुरविणे आणि सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करणे हा उद्देश आहे.

हेही वाचा-गोव्याचे निवडणूक प्रभारी फडणवीसांनी घेतल्या नाराज आमदारांच्या गाठीभेटी; काँग्रेसमध्येही केली चाचपणी

ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे होणार शक्य-

सीएससी ई-गव्हर्नस सर्व्हिसेस इंडियाचे महासंचालक दिनेश त्यागी म्हणाले, की अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाबरोबर आम्ही भागीदारी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, त्या लोकांपर्यंत सीएससीद्वारे पोहोचणे शक्य होणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली आणि मोफत रेशनच्या विविध सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार

सेतू सुविधा केंद्रात या मिळणार सेवा

  • रेशन कार्ड किती उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल.
  • रेशन कार्डाशी संबंधित माहिती सेतू सुविधा केंद्रात अपडेट करता येईल.
  • रेशन कार्ड हरविले तर नवीन रेशन कार्डासाठी अर्ज करता येईल.
  • रेशन कार्डामधील तपशीलामध्ये माहिती अपडेट करता येईल.
  • रेशन कार्ड हे आधारशी संलग्न करता येईल.
  • रेशन कार्डची नक्कल प्रिंट काढता येईल

हेही वाचा-महंत नरेंद्र गिरींचा गुदमरून मृत्यू; शवविच्छेदन अहवालात समोर

हे आहेत रेशन कार्डाचे प्रकार!

उत्पन्नावर आधारित नागरिकांना रेशन कार्ड दिले जाते. दारिद्र्य रेषेवरील लोकांना एपीएल, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांकरिता बीपीएल आणि सर्वात गरीब असलेल्या नागरिकांना अंत्योदय ही तीन प्रकारची रेशन कार्ड दिली जातात. ही वर्गवारी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर निश्चित केली जाते.

Last Updated :Sep 22, 2021, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.