Today Cryptocurrency Prices : बिटकॉईन म्हणजे काय ? जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

author img

By

Published : Jan 24, 2023, 6:36 AM IST

Updated : Jan 24, 2023, 7:13 AM IST

Today Cryptocurrency Prices

क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांई मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर काय आहेत, जाणून घ्या. बीटकॉईन म्हणजे काय याबद्दल सर्वांना उत्सुकता असते. हे जाणून घेवू या.

मुंबई : बिटकॉइन हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय.आज बिटकॉइनची किंमत 18,72,356 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,32,884 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,928 रूपये आहे. बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे.

Today Cryptocurrency Prices
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टोकरन्सी दर : बिटकॉइन आजच्या काळात खूप लोकप्रिय होत आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा बिटकॉइनला जास्त किंमत नव्हती. पण आज प्रत्येक व्यक्ती बिटकॉइन खरेदी करण्यासाठी इच्छुक आहे. पण बिटकॉइन कसे खरेदी करायचे? तसेच बिटकॉइन कसे काम करते. त्यासोबत बिटकॉइनचे फायदे आणि तोटे काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती आपण आज जाणून घेवू या.

ऑनलाईन उपलब्ध : कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत.

बिटकॉइनचा वापर ऑनलाइन : बिटकॉइन ही एक डिजिटल करंसी आहे. त्याला सोप्प्या भाषेत इंटरनेट करंसी असेही म्हटले जाते. या चलना द्वारे पैसे जगभरात कुठेही पाठवता येतात. बिटकॉइनला आपण आपल्या घरी किंवा वॉलेटमध्ये ठेवू शकत नाही. कारण बिटकॉइन ही एक नोट किवा कॉइन नाही. बिटकॉइनचा वापर आपल्याला फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येतो. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करत आहे.

पीयर टू पीयर नेटवर्क : बिटकॉइन एक विकेंद्रित करंसी म्हणून ओळखली जाते. कारण ह्या करंसीला कंट्रोल करण्यासाठी कोणतीही अथॉरिटी, गवर्नमेंट किंवा बँकेची गरज पडत नाही. बिटकॉइन ही करंसी पीयर टू पीयर नेटवर्कवर काम करते. म्हणजे कधी कोणत्या व्यक्तीला बिटकॉइन खरेदी करायचे असेल, तेव्हा तो व्यक्ती डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग यांच्या माध्यमातून सरळ ट्रांझिक्शन करू शकतो. बिटकॉइनचा आविष्कार संतोषी नाकामोतो याने 2009 मध्ये केला होता. तसेच तेव्हा ृपासून लोकं बिटकॉइनचा वापर खूप प्रमाणात करत आहेत.

हेही वाचा : Google Freezes Employees Green Card : गुगलने कर्मचाऱ्यांचे ग्रीन कार्ड अर्ज गोठवले

Last Updated :Jan 24, 2023, 7:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.