खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभेतच सुनावले

author img

By

Published : Dec 7, 2022, 2:16 PM IST

Updated : Dec 7, 2022, 6:46 PM IST

खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभेतच सुनावले

खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभेतच सुनावले. त्या म्हणाल्या की, गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्रात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शेजारील राज्य कर्नाटकचे मुख्यमंत्री मूर्खपणाचे बोलत आहेत. काल महाराष्ट्रातील लोकांना कर्नाटक सीमेवर जायचे होते पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे.

नवी दिल्ली - लोकसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभेतच सुनावले. त्या म्हणाल्या की, गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्रात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शेजारील राज्य कर्नाटकचे मुख्यमंत्री मूर्खपणाचे बोलत आहेत. काल महाराष्ट्रातील लोकांना कर्नाटक सीमेवर जायचे होते पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे बोलत आहेत. दोन्ही राज्ये भाजपशासित आहेत. महाराष्ट्रातील लोकांना त्यादिवशी मारहाण झाली. हे सगळे योग्य नाही असे त्या म्हणाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावर बोलण्याचे आवाहन त्यांनी केले.

दुसरीकडे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुप्रिया सुळे आक्रमक झाल्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनीही बोलताना जरा जपून बोलावे असा सूचनावचा सल्लाही बिर्ला यांनी दिला.

सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले होते की, की ते या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणार आहेत. पत्रकार परिषदेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की होते की, मंगळवारी झालेल्या घटनांबाबत मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोललो आहे. दरम्यान आज त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली असल्याचेही वृत्त आहे.

फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडताना म्हटले होते की, 'छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत आणि ते राहतील, कोणीही चुकीचे विधान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खराब करू शकत नाही. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई आणि त्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंगळवारी फोनवर या विषयावर चर्चा केली आणि दोन्ही राज्यांनी शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे यावर सहमती दर्शविली.

महाराष्ट्र सरकारने प्रामुख्याने कन्नड भाषिक 260 गावे हस्तांतरित करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु कर्नाटकने हा प्रस्ताव फेटाळला. आता हे प्रकरण जलदगतीने निकाली काढण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि हे प्रकरण प्रलंबित आहे.

Last Updated :Dec 7, 2022, 6:46 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.