Karnataka PSI Transferred : नवलच! कर्नाटकातील पोलिसाची सात दिवसांत तीन वेळा बदली

Karnataka PSI Transferred : नवलच! कर्नाटकातील पोलिसाची सात दिवसांत तीन वेळा बदली
कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याची सात दिवसांत तीन वेळा बदली करण्यात आली ( Karnataka PSI Transferred ) आहे.
कर्नाटक - कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याची सात दिवसांत तीन वेळा बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याची एका आठवड्यात तीन वेळा बदली झाल्याने राज्यात चर्चेचा विषय बनला ( Karnataka PSI Transferred ) आहे.
रविकुमार, असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते पीएसआय पदावर कार्यरत आहेत. रविकुमार यांची ६ मे रोजी बेगुरु स्थानकात बदली झाली होती. त्यानंतर 7 मे रोजी आदेशात बदल करुन बेगुरु स्टेशनवरुन गुंडलुपेटे पोलीस स्थानकातील गुन्हे विभागात बदली करण्यात आली. परत 11 मे रोजी गुंडलुपेटे स्टेशनवरुन कोडगू जिल्ह्यातील विराजपेटे गाव स्थानकात बदली झाली आहे. रविकुमार अद्याप विराजपेटे स्थानकात कामावरती रुजू न झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, रविकुमार यांची आठवड्यात तीन ठिकाणी बदली झाल्याने त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी 'ईटिव्ही भारत'ने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही पोलीस खात्याची अंतर्गत बाब असल्याने याप्रकरणी कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
हेही वाचा - Warehouse Fire Delhi : दिल्लीतील तीन मजली इमारतीला आगीत मृतांचा आकडा २७ वर, १२ जण जखमी
