महाराष्ट्रातील स्टील कंपनीच्या 44 हून अधिक मालमत्तांवर छापे; 175.5 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त

author img

By

Published : Aug 28, 2021, 6:41 PM IST

प्राप्तिकर विभाग कारवाई

प्राप्तिकर विभागाने छाप्यादंरम्यान बनावट बिलेही जप्त करण्यात आली आहेत. बनावट बिलामधून ग्रुपने 160 कोटींची खरेदी झाल्याचे दाखविले. सध्या, या बिलांबाबत पडताळणी सुरू असून फसवणुकीच्या रकमेमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवामध्ये एका ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. प्राप्तिकर विभागाने या ग्रुपच्या 44 हून अधिक मालमत्तांवर छापे टाकले आहेत. हा ग्रुप आघाडीचा स्टील उत्पादक कंपनीचा आहे. या ग्रुपकडून पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवामध्ये व्यवसाय करण्यात येतो.

प्राप्तिकर विभागाने स्टील उत्पादनाशी संबंधित ग्रुपच्या मालमत्तांवर 25 ऑगस्टला छापे टाकले आहे. प्राप्तिकर विभागाने छाप्यादरम्यान अनेक कागदपत्रे आणि डिजीटल पुरावे जप्त केली आहेत. ग्रुप बेकायदेशीरपणे भंगार खरेदीसारख्या प्रकरणात गुंतल्याचे पुराव्यातून दिसून येत असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा-माझे वडील तालिबानसमोर कधीच झुकणार नाहीत- अमरुल्लाह सालेह यांच्या मुलीचे भावनिक ट्विट

बनावट बिलामधून 160 कोटींची खरेदी-

प्राप्तिकर विभागाने छाप्यादंरम्यान बनावट बिलेही जप्त करण्यात आली आहेत. बनावट बिलामधून ग्रुपने 160 कोटींची खरेदी झाल्याचे दाखविले. सध्या, या बिलांबाबत पडताळणी सुरू असून फसवणुकीच्या रकमेमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

एकूण 175.5 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त

बेहिशोबी मालमत्ताही आढळून आली आहे. यामध्ये 3 कोटी रोख रक्कम आणि 5.20 कोटी रुपयांचे ज्वेलरी, 194 किलो चांदीच्या वस्तू (किंमत 1.34 कोटी) यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने एकूण 175.5 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. अजून प्राप्तिकर विभागाचे छापे आणि तपास सुरू आहे.

हेही वाचा-BH SERIES राज्य बदलले तरी वाहनांची करावी लागणार नाही पुनर्नोंदणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.