खराब रस्त्यामुळे अॅम्बुलन्सचा येण्यास नकार, हॉस्पिटलमध्ये खाटेवर घेऊन जाताना महिलेचा मृत्यू

खराब रस्त्यामुळे अॅम्बुलन्सचा येण्यास नकार, हॉस्पिटलमध्ये खाटेवर घेऊन जाताना महिलेचा मृत्यू
Woman Carried On Cot : पश्चिम बंगालमध्ये खराब रस्त्यांमुळे एक आजारी महिला वेळेवर दवाखान्यात पोहचू शकली नाही. त्या महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. वाचा पूर्ण बातमी...
मालदा (प. बंगाल) Woman Carried On Cot : पश्चिम बंगालमधील मालदा येथे खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांनी एका आजारी महिलेला सेवा देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबियांनी तिला खाटेवरून रुग्णालयात नेलं. मात्र वाटेतच त्या महिलेचा मृत्यू झाला.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल : मालदा जिल्ह्यातील मालडांगा गावात शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ एका भाजपा नेत्यानं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर व्हायरल झाला. 'ईटीव्ही भारत' मात्र या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. भाजपा नेत्यानं ती व्हिडीओ क्लिप घेतल्याचं सांगितलं. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय. स्थानिक बीडीओ यांनी लवकरच रस्ता दुरुस्त करण्याचं म्हटलं आहे.
महिलेचा वाटेत मृत्यू झाला : माहितीनुसार, ममोनी रॉय (१९) असं मृत महिलेचं नाव आहे. ती मालडंगा गावात राहते. महिलेचा पती कार्तिक रॉय शेतकरी आहे. मामोनीला गेल्या गुरुवारपासून खूप ताप येत होता. शुक्रवारी दुपारी तिची प्रकृती खालावली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र गावात खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिका किंवा गाडीची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला एका खाटेवर टाकून बामनगोला ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केलं. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी मामोनीला मृत घोषित केलं. त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं की, तिला आधी घेऊन आले असते तर तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करता आला असता.
भाजपा नेत्याचा आरोप : या घटनेनंतर उत्तर मालदा भाजपाच्या महिला मोर्चाच्या नेत्या वीणा सरकार कीर्तनिया यांनी एक व्हिडिओ क्लिप फेसबुकवर प्रसिद्ध केली. यामध्ये मालडंगा बूथच्या लोकांनी नूतनीकरणाच्या मागणीसाठी यापूर्वी रस्ता रोको केल्याचं दिसतंय. त्यानंतर बीडीओनं लवकरच रस्ता तयार करण्याचं आश्वासन दिलं होतं, असं भाजपा नेत्याचं म्हणणं आहे. मात्र बीडीओकडून रस्ता तयार न झाल्यानं १९ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा :
