कोव्हिशिल्ड घेऊनही आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यातील अडथळा; पुनावाला यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

author img

By

Published : Jun 28, 2021, 8:55 PM IST

अदर पुनावाला

युरोपियन मेडिसीन एजन्सीने बायोएनटेक, फायझर, मॉर्डना आणि जानसीन (जॉन्सन अँड जॉन्सन) या लशींना मान्यता दिली आहे. अद्याप कोव्हिशिल्डला युरोपियन युनियनने कोव्हिशिल्डला परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली - कोव्हिशिल्डची लस घेऊनही आंतरराष्ट्रीय प्रवास करताना अनेक प्रवाशांना अडचणी येत आहेत. त्यावर कोव्हिशिल्डचे उत्पादन घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोव्हिशिल्डचा डोस घेऊनही ज्या भारतीयांना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यावर नक्कीच मार्ग निघेल अशी आशा पुनावाला यांनी व्यक्त केली आहे.

कोव्हिशिल्डच्या उत्पादनासाठी पुण्यातील सीरम इन्स्टि्यूटने ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेनेकाकडून परवाना घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की जे भारतीय युरोपियनमध्ये प्रवास करण्यात अडथळ्यांचा सामना करत आहेत, त्यांना आश्वस्त करू इच्छितो. हा प्रश्न उच्चस्तरीय पातळीवर नेण्यावर आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा आहे. ही समस्या दोन्ही देशांमधील नियामक आणि राजनैतिक पातळीवर उपस्थित करण्यात येणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-काश्मीर पोलिसांना मोठे यश! लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडरला अटक

या लशींना युरोपियन मेडिसीन एजन्सीने दिली मान्यता

युरोपियन मेडिसीन एजन्सीने बायोएनटेक, फायझर, मॉर्डना आणि जानसीन (जॉन्सन अँड जॉन्सन) या लशींना मान्यता दिली आहे. अद्याप कोव्हिशिल्डला युरोपियन युनियनने कोव्हिशिल्डला परवानगी दिली आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्या भारतीयांना प्रवास करण्याची परवानगी मिळण्यात अडथळे येत आहेत.

हेही वाचा-वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!

कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये कालावधी वाढला आहे-

देशात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. एका व्यक्तीला कोरोना लसीचे दोन डोस देण्यात येतात. कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. हा कालावधी 12 ते 16 आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. सरकारच्या राष्ट्रीय लस सल्लागार समितीने दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा शिफारस केली होती.

सीरमने सुरू केले कोवोवॅक्सचे उत्पादन

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोवोवॅक्सच्या वैद्यकीय चाचण्या देशात सुरू होणार असल्याचे मार्च 2021 मध्ये म्हटले होते. ही लस सप्टेंबरमध्ये लाँच होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. सध्या कंपनीकडून कोव्हिशिल्डचे उत्पादन घेण्यात येत आहे. ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.