Haryana Nuh Violence : हरियाणामधील अनेक जिल्ह्यांची इंटरनेट सेवा बंद, आतापर्यंत 165 जणांना अटक
Published: Aug 3, 2023, 3:29 PM


Haryana Nuh Violence : हरियाणामधील अनेक जिल्ह्यांची इंटरनेट सेवा बंद, आतापर्यंत 165 जणांना अटक
Published: Aug 3, 2023, 3:29 PM

हरियाणाच्या नूहमध्ये 31 जुलै रोजी ब्रज मंडळ यात्रेदरम्यान दोन गटात हाणामारी (Nuh Violence) झाली होती. या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात 116 जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये (Nuh Violence Internet Ban) अजूनही तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या भागात 5 ऑगस्टपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चंडीगढ : नूह येथे झालेल्या हिंसाचारानंतर (Nuh Violence) हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. फरिदाबाद आणि पलवल जिल्ह्यांमध्ये आणि गुरुग्रामच्या तीन उपविभागांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने आदेश (Nuh Violence Internet Ban) जारी करत या भागांमध्ये 5 ऑगस्टपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे.
इंटरनेट सेवा बंद: हरियाणाच्या गृहसचिवांनी नूह, फरिदाबाद, पलवल आणि गुरुग्रामच्या उपायुक्तांसह संबंधित जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर आणि तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे गृहसचिवांनी म्हटले आहे. इंटरनेट सेवा बंद करण्याचा आदेश जारी करताना गृह सचिवांनी म्हटले आहे की, मोबाईल फोन आणि एसएमएसवर व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोणीही चुकीची माहिती आणि अफवा पसरू नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे आंदोलक पुन्हा संघटित होऊन मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे सरकारने हिंसाचारग्रस्त भागात 5 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पीडितांना न्याय मिळेल: दरम्यान हरियाणा सरकारने दुसऱ्या IRB बटालियनचे मुख्यालय भोंडसी येथून नूह येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. नूह हिंसाचार प्रकरणात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले की, नूह हिंसाचारात सहभागी असलेल्या दोषींना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
पोलिसांचे आवाहन: गुरुग्राम पोलीस परिसरात कायदा आणि सुव्यवस्था, शांतता आणि समन्वय प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. गुरुग्राम पोलिसांकडून विविध भागात फ्लॅग मार्च काढून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लोकांना कोणत्याही अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गुरुग्राम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा-
