कोकणी ही गोव्याची राज्यभाषा, मराठीची बोलीभाषा नाही - मुख्यमंत्री प्रमोद सावंत
Updated on: May 14, 2022, 10:48 PM IST

कोकणी ही गोव्याची राज्यभाषा, मराठीची बोलीभाषा नाही - मुख्यमंत्री प्रमोद सावंत
Updated on: May 14, 2022, 10:48 PM IST
इतर भाषांप्रमाणे कोकणीला ही आपलं स्वतंत्र अस्तित्व असून ती गोव्याची राजभाषा आहे. आम्हाला आमच्या कोकणीचा अभिमान आहे. महाराष्ट्रातील रायगडपासून केरळ पर्यंत विविध अंगाने कोकणी भाषा बोलली जाते. गोव्यासाठी कोकणी आमचा अभिमान स्वाभिमान सर्वकाही आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले
सिंधुदुर्ग/पणजी - कोकणी ही एक स्वतंत्र भाषा असून तिला इतर भाषेप्रमाणे स्वतंत्र स्थान आहे. त्यामुळे कोकणीला कोणीही मराठीची बोली भाषा म्हणू नये असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखिल भारतीय कोकणी परिषदेत बोलताना सांगितले. कोकणी परिषदेचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
