श्रीनगर जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये फिल्म टूरिझम फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड कल्चरल प्रिझर्व्हेशन या विषयावरील पहिल्या G20 शिखर परिषदेला सोमवारी सुरुवात झाली अनेक देशांचे प्रतिनिधी आणि अधिकारी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी श्रीनगरला पोहचले आहे यावेळस त्यांनी परिषदेला संबोधित करताना त्यांच्या काश्मीर आणि चित्रपटांच्या आठवणी सांगितल्या G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी तरुण असताना काश्मीरमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण करून दिली आणि काश्मीरमधील दृश्यांशिवाय बॉलीवूड चित्रपट कसा अपूर्ण आहे हे देखील सांगितले काश्मीरमध्ये चित्रपट निर्मितीसाठी भरपूर वाव ते म्हणाले की मी काश्मीरला भेट दिली तेव्हा काश्मीरच्या पहलगाममध्ये एका चित्रपटाचे शूटिंग पाहण्याचे भाग्य मला मिळाले ते पुढे म्हणाले की काश्मीरमध्ये चित्रपट निर्मितीसाठी भरपूर वाव आहे काश्मीरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे चित्रपटांच्या शूटिंगसाठी काश्मीरपेक्षा चांगली जागा असू शकत नाही आम्ही येथे चित्रपटांच्या शूटिंगमध्ये मदत करू काश्मीरच्या व्यक्तींचे बॉलिवूडमध्ये मोठे योगदान भारताच्या कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात जम्मू आणि काश्मीरमधील अभिनेते आणि दिग्दर्शकांचे बॉलिवूडमध्ये किती मोठे योगदान आहे हे सांगितले आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करत ते म्हणाले की केएल सहगल जीवन ओमप्रकाश राज कुमार आणि रामानंद सागर यांनी काश्मीरमध्ये चित्रपट बनवण्यात मोठे योगदान दिले आहे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा दिली आहे श्रीनगरकडे चित्रपट निर्माते आकर्षित होतात ते पुढे म्हणाले की चित्रपट निर्मितीमुळे विद्यार्थ्यांना पार्टटाईम नोकरीही मिळत आहे या आधी पाकिस्तानच्या बाजूने संप पुकारला जात असे पण आता काहीच होत नाही आता परिस्थिती सुधारली असून याचे श्रेय आम्ही सर्वसामान्यांना देतो असे ते म्हणाले केंद्रीय पर्यटन मंत्री जीके रेड्डी यांनी आपल्या भाषणात सांगितले की श्रीनगर हे भारतातील सर्वात जुने आणि सुंदर शहर आहे आपल्या अनोख्या सौंदर्यामुळे शहराने गेल्या काही वर्षांत चित्रपट निर्मात्यांना आकर्षित केले आहे संपूर्ण भारतात चित्रपट पर्यटन पुनरुज्जीवित करणे हा आमचा उद्देश आहे चित्रपट पर्यटन विकासासाठी प्रयत्न पाहुणे व प्रतिनिधींचे आभार व्यक्त करून ते म्हणाले की पर्यटन विकासासाठी आम्ही सर्वसमावेशक कार्यक्रम करत आहोत आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने आणि द एलिफंट व्हिस्कर्स या लघुपटाने यंदाचा ऑस्कर जिंकला चित्रपट पर्यटन हे केवळ रुपेरी पडद्यापुरते मर्यादित नसून ते आपली संस्कृती आणि स्थानिक कलागुणांना वाव देते आणि हा आमचा अजेंडाही असल्याचे ते म्हणाले हेही वाचा Manipur Violence मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार अनेक घरे जाळली कर्फ्यूच्या वेळेत वाढPak FM Bilawal visits PoK पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची पीओकेला भेटG20 Srinagar summit G20 बैठकीसाठी मोठ्या संख्येने येणार प्रतिनिधी ही आहेत उद्दिष्टे