rajya sbha election in India : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर; 10 जूनला होणार मतदान

author img

By

Published : May 12, 2022, 6:12 PM IST

rajya sbha election in India

भारतीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India on Rajya sabha election ) राज्यसभेच्या 57 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशातील 15 राज्यांमध्ये 57 जागांवर निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात आहेत. छत्तीसगडमध्येही 2 जागांवर निवडणूक होणार आहे. छत्तीसगड व्यतिरिक्त बिहारमधील 5 जागांवर निवडणूक होत आहे. तर महाराष्ट्रातील सहा जागांवर निवडणूक होणार ( Rajya Sabha Maharashtra seats ) आहे.

नवी दिल्ली - राज्यसभेच्या 57 जागांवर होणाऱ्या निवडणुकीबाबत एक मोठी ( elections for 57 Rajya Sabha seats ) बातमी आहे. देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार ( Rajya Sabha election date ) आहे. राज्यसभेत 245 सदस्य आहेत, बहुमताचा आकडा 123 आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India on Rajya sabha election ) राज्यसभेच्या 57 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशातील 15 राज्यांमध्ये 57 जागांवर निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात आहेत. छत्तीसगडमध्येही 2 जागांवर निवडणूक होणार आहे. छत्तीसगड व्यतिरिक्त बिहारमधील 5 जागांवर निवडणूक होत आहे. तर महाराष्ट्रातील सहा जागांवर निवडणूक होणार ( Rajya Sabha Maharashtra seats ) आहे.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक 11 जागा- उत्तर प्रदेशात सर्वाधिक 11 जागा आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो - प्रत्येक राज्यात प्रत्येकी सहा जागा आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.24 मे पासून नावनोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यसभेसाठी ३१ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्याचवेळी उमेदवारी अर्जांची छाननी १ जून रोजी होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांना ३ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. राज्यसभेसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर 11 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रातील या सहा जागांसाठी होणार निवडणूक- महाराष्ट्रातील राज्यसभेवरील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल, काँग्रेसकडून पी चिदंबरम, यांची ( Sanjay Raut Rajya Sabha election ) मुदत संपत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून विनय सहस्त्रबुद्धे, पियुष गोयल, आणि विकास महात्मे या तीन राज्यसभेवरील खासदारांचे मुदत संपत आहे. त्यामुळे या सहा जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा-Raj Thackeray Ayodhya visit : खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दोऱ्याला विरोध

हेही वाचा-शहाजहानने आमच्या जमिनीवर कब्जा करून ताजमहाल बांधला : भाजप खासदार दिया कुमारी

हेही वाचा-फरीदाबादमध्ये भिक्षेकरूकडे मिळाली तब्बल 50 लाखांची रोकड, पोलिसांच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.