चारधाम यात्रेचा 18 सप्टेंबरपासून उत्तराखंडमध्ये पुन्हा श्रीगणेशा

author img

By

Published : Sep 17, 2021, 4:25 PM IST

Chardham Yatra

यात्रेतील मार्गावरील संवदेनशील क्षेत्रात रस्त्यांची कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात्रेकरू हे मार्गाने पायीदेखील प्रवास करतात. हे लक्षात घेऊन रस्त्यांची स्वच्छता आणि सुरक्षित करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिली आहे.

देहरादून- कोरोनाच्या संकटात चारधाम यात्रेवर आलेले विघ्न दूर झाले आहे. कारण, नैनीताल उच्च न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नैनीताल उच्च न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे उत्तराखंड सरकारला निर्देश दिले आहेत. त्यानंतर उत्तराखंडने चारधाम यात्रेकरिता व्यवस्था सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्य सचिव डॉ. एस. एस. संधू यांच्या अध्यक्षतेखाली चारधाम यात्रा सुरक्षित, व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने पार पाडावी, याकरिता विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मुख्य सचिवांनी यात्रेदरम्यान चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा सुसज्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा-मोदींच्या बर्थडेला मिळणार गिफ्ट? पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्याने होतील कमी?

मुख्य सचिवांनी हे दिले निर्देश

मुख्य सचिवांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना चारधाम यात्रेतील मार्गावर रस्ते सुरक्षा, साफसफाई, गर्दीवरील नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्था, कोरोना चाचणी आदी व्यवस्थेकरिता अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यात्रेतील मार्गावरील संवदेनशील क्षेत्रात रस्त्यांची कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात्रेकरू हे मार्गाने पायीदेखील प्रवास करतात. हे लक्षात घेऊन रस्त्यांची स्वच्छता आणि सुरक्षित करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिली आहे. याचबरोबर मार्गात पिण्याची पाण्याची सुविधा, शौचालय आदी व्यवस्था करण्याचे आदेशही दिले आहेत.

हेही वाचा- मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य!

नैनीताल उच्च न्यायालयाने चांगला निर्णय घेतला-सतपाल महाराज

भाविकांची कोरोना चाचणी, कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन, भाविकांना चांगली वागणूक, आपत्कालीन काळात नियंत्रण कक्षाशी संपर्क, सोशल डिस्टन्सिंग आधी सूचना माध्यमामधून प्रसारित करण्याचे मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत. चारधाम यात्रेवरील निर्बंध हटवून नैनीताल उच्च न्यायालयाने खूप चांगला निर्णय घेतल्याचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या काळात नितीन गडकरींकडून युट्यूबचा वापर; महिन्याला कमवितात 'इतके' लाख रुपये

गतवर्षी कोरोनामुळे चारधाम यात्रा होती स्थगित

दरम्यान, हिमालयीन परिसरातील बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार मंदिरांचे दर्शन चारधाम यात्रेत असते. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गतवर्षी चारधामा यात्रा स्थगित करण्यात आली होती. चारही मंदिरे खुली करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये भाविकांना प्रवेश देण्यात आलेला नव्हता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.