Budgam Terrorist Attack : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा तहसील कार्यालयावर हल्ला; कर्मचारी जखमी

Budgam Terrorist Attack : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा तहसील कार्यालयावर हल्ला; कर्मचारी जखमी
बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात आतंकवाद्यांनी तहसील कार्यालयावर ( Budgam Terrorist Attack ) हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला ( Tehsildar office employee Injures Terrorist Attack ) आहे.
बडगाम - जम्मू-काश्मीमध्ये आतंकवादी सातत्याने हल्ला करत असतात. त्यांच्या निशाणावर नेहमी सामान्य नागरिक राहतात. त्यातच आता बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात दहशतवाद्यांनी तहसील कार्यालयावर हल्ला केला ( Budgam Terrorist Attack ) आहे. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला ( Tehsildar office employee Injures Terrorist Attack ) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात संशयित दहहशतवाद्यांनी तहसील कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात कार्यालयातील कर्मचारी जखमी झाला आहे. या कर्मचाऱ्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
The injured was immediately brought to SMHS Hospital, Srinagar for treatment where he succumbed to his injuries. Preliminary investigation reveals that 2 terrorists are involved in this heinous crime & have used pistol for committing this crime: J&K Police
— ANI (@ANI) May 12, 2022
काश्मीर पोलिसांनी ट्विटरवर माहिती देताना सांगितले की, दहहशतवाद्यांनी चदूरा येथील तहसील कार्यालयावर हल्ला केला. त्यात अल्पसंख्याक समुदायातील राहुल भट्ट नावाच्या कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा - Pune Child Abuse Case : ...म्हणून 'त्या' बालकाला श्वानांसोबत कोडल्यांची माहिती!
