Pakistani Drone Shot: अमृतसरमध्ये अंमली पदार्थ घेऊन जाणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले; दोन दिवसांत बीएसएफची चौथी कारवाई
Published: May 21, 2023, 7:48 AM


Pakistani Drone Shot: अमृतसरमध्ये अंमली पदार्थ घेऊन जाणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले; दोन दिवसांत बीएसएफची चौथी कारवाई
Published: May 21, 2023, 7:48 AM
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकार्यांनी अमृतसरमध्ये एक पाकिस्तानी ड्रोन पाडला. तसेच अमृतसरमधून संशयित अमली पदार्थ असलेली बॅग जप्त केली, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. पाकिस्तानच्या एका ड्रोनने शुक्रवारी भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले. अमृतसर सेक्टरच्या बीएसएफच्या जवानांनी त्याला पाडले.
अमृतसर : अमृतसर जिल्ह्यातील उधर धारिवाल गावाजवळील परिसरात १९ मे रोजी रात्री ८:५५ च्या सुमारास, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित ड्रोनचा कर्कश आवाज ऐकला. जवानांनी गोळीबार करून ड्रोनला रोखण्यासाठी त्वरित कारवाई केल्याचे बीएसएफच्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या दोन दिवसात बीएसएफने हे चौथे ड्रोन पाडले आहे. याआधी शुक्रवारी बीएसएफने अमृतसरमध्ये दोन ड्रोन पाडले होते.
अमली पदार्थ तस्करीचा प्रयत्न : परिसराच्या प्राथमिक शोधादरम्यान, बीएसएफच्या जवानांनी शेतीच्या शेतातून अर्धवट तुटलेल्या अवस्थेत काळ्या रंगाचे ड्रोन जप्त केले. दुसऱ्या घटनेबाबत, बीएसएफच्या जवानांनी अमृतसर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून आलेला एक ड्रोन पाडला. पाकिस्तानमध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात होता. बीएसएफच्या जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. गोळीबार करून ड्रोनला रोखण्यात आले. परिसरात शोध घेतल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी एक ड्रोन जप्त केला. लोखंडी रिंगद्वारे ड्रोनला जोडलेल्या अंमली पदार्थांची 2 पॅकेट असलेली एक खेप होती, असे बीएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
अमली पदार्थ असलेली बॅगही जप्त : जप्त केलेल्या संशयित हेरॉईन मालाचे एकूण वजन अंदाजे 2.6 किलोग्रॅम आहे. बीएसएफ जवानांनी पाकिस्तानमधून आणखी एक ड्रोन खाली पाडले आहे. ड्रोनला अडकवलेली संशयित अमली पदार्थाची बॅगही जवानांनी जप्त केली. अमृतसरमध्ये एका रात्रीत पाडण्यात आलेले हे दुसरे ड्रोन आहे, असे ट्विट बीएसएफ फ्रंटियर पंजाबने केले आहे. जानेवारीत देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. बीएसएफ जवानांनी पंजाबच्या गुरदासपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 2 किलोमीटर अंतरावर सुमारे एक किलोग्रॅम हेरॉइन वाहून नेणारे पाकिस्तानी ड्रोन जप्त केले होते.
हेही वाचा :
