अशीही व्यथा! पती घरखर्चासाठी पैसे पाठवेना, पत्नीने दीड लाखात विकलं स्वत:चचं नवजात बाळ

अशीही व्यथा! पती घरखर्चासाठी पैसे पाठवेना, पत्नीने दीड लाखात विकलं स्वत:चचं नवजात बाळ
Baby Sale Case: पती घरखर्चासाठी पैसे पाठवत नाही म्हणून एका महिलेने तिच्या 18 दिवसांच्या बाळाची दीड लाख रुपयात विक्री केली. (New born baby sold by woman) ही घटना पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात घडली आहे. (Baby sale due to poverty) या महिलेचा पती दुसऱ्या राज्यात काम करतो. तिने पैसे पाठवण्यास सांगितल्यावर पतीने तिला दुसरे लग्न करण्यास सांगितले. शेवटी आर्थिक विवंचनेतून नाईलाजास्तव महिलेने हे पाऊल उचलल्याचं सांगितल्या जात आहे.
मालदा (पश्चिम बंगाल) Baby Sale Case: अत्यंत गरिबीने त्रस्त असलेल्या पश्चिम बंगालमधील मालदा येथील एका 20 वर्षीय महिलेने आपल्या 18 दिवसांच्या बाळाला दीड लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. मालदा येथील हरिश्चंद्रपूर येथे ही घटना उघडकीस आली. यानंतर हे मूल आईला परत करण्यात आले; मात्र तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने मूल विकत घेतलेल्या व्यक्तीला पैसे परत केले नाहीत, तर महिलेला सुपूर्द केल्याचे समोर आले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Malda baby sale case)
घटनेची चौकशी करण्याचे बीडीओला आदेश: ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या घटनेने गावात प्रचंड खळबळ माजली. शेवटी गावकऱ्यांच्या दबावानंतर टीएमसी नेत्याने बाळ विकत घेतलेल्या एका महिलेला 1.20 लाख रुपये परत केले आणि उर्वरित 30,000 रुपये 10 दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले. आश्चर्य म्हणजे आतापर्यंत याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. स्थानिक उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित बीडीओला दिले आहेत.
पतीचे ते उत्तर ऐकून पत्नीही चक्रावली: महिलेचा नवरा दुसऱ्या राज्यात मजूर म्हणून काम करतो. पत्नीने त्याच्याकडे घरखर्चासाठी पैसे पाठवावे अशी अनेकदा विनंती केली; परंतु तो पैसेच पाठवत नव्हता, अशी माहिती मिळाली आहे. तिची आई तिला घरखर्च भागवण्यासाठी दरमहा 1,500 रुपये द्यायची. आधीच एक मूल असलेल्या या महिलेने 1 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. दोन मुलांचे संगोपन करणं आपल्यासाठी अशक्य असल्याचं लक्षात येताच तिने आर्थिक मदतीसाठी पतीकडे विनंती केली. मात्र, तरीही पतीचे मन वितळले नाही. उलट त्याने पत्नीला सांगितले की, तिला पैशाची एवढीच गरज असेल तर तिने दुसऱ्याशी लग्न करावे. हे ऐकूण महिला थक्कच झाली.
बिगर बंगाली दाम्पत्याने विकत घेतले बाळ: त्यानंतरच महिलेने आपल्या नवजात मुलाला विकण्याचा निर्णय घेतला. एका बिगर बंगाली औषध विक्रेत्याच्या सासूने मुलाला विकत घेतल्याचे तिने सांगितले. माजी ग्रामपंचायत सदस्य आणि टीएमसी नेत्याच्या पुढाकारानंतर, मुलाला त्याच्या आईकडे परत करण्यात आले. मात्र, व्यवसायाने शिक्षक असलेल्या टीएमसी नेत्याने मुलाला विकत घेतलेल्या महिलेला पैसे परत केले नसल्याचा आरोप आहे.
हेही वाचा:
