ATM Transaction Alert : एटीएममधून पैसे काढताना 'या' चार चुका करने टाळा, अन्यथा होऊ शकते फसवणुक

author img

By

Published : Dec 7, 2022, 2:18 PM IST

ATM Transaction Alert

कितीही ऑनलाईन व्यवहार केलेत तरी, कधीना कधी आपल्याला रोख रक्कमेची गरज पडत असते. मग रोख रक्कम काढण्यासाठी आपण एटीएमचा वापर (Utility News) करतो. मात्र, हे करीत असतांना धोका टाळण्यासाठी (withdrawing money from ATMs to avoid fraud) काय काळजी (Avoid making these four mistakes) घ्यावी , ते जाणुन घेऊया. ATM Transaction Alert

भूतकाळ आठवला तर असे दिसून येते की, पूर्वी लोक बँकांमध्ये तासन् तास लांब रांगेत उभे असायचे. पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करण्यापर्यंत रांगा लावाव्या लागल्या. एवढेच नाही तर कधी कधी सर्व्हरनेही फसवणूक केली आणि नंतर अनेकवेळा रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. पण आता काळ बदलला आहे. कारण आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही आणि तुम्ही एटीएम मशीनद्वारे काही मिनिटांत तुमचे पैसे काढू शकता. त्याचबरोबर जेवढ्या सुविधा वाढल्या आहेत, तेवढेच फसवणूक करणारे लोकांची फसवणूक (withdrawing money from ATMs to avoid fraud) करण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत, हेही नाकारता येणार नाही. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही काही चुका न करून (Avoid making these four mistakes) एटीएम फसवणूक टाळू शकता, कारण एटीएममधून पैसे काढताना अनेकदा लोक काही छोट्या चुका करतात. चला तर मग जाणून घेऊया (Utility News) त्यांच्याबद्दल. ATM Transaction Alert

अनेकजण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जातात आणि काहीही न पाहता परत येतात. परंतु तुम्ही कार्ड ज्या ठिकाणी टाकले आहे ते तपासावे की येथे क्लोनिंग यंत्र बसवले आहे का? शंका असल्यास त्या एटीएममधून पैसे काढू नका आणि त्याबाबत पोलिस आणि बँकेला कळवा. अनेक लोक आपला एटीएम पिन टाकताना कीपॅड हाताने झाकत नाहीत. जेव्हा तुम्ही एटीएम मशिनमध्ये तुमचा पिन टाकाल तेव्हा कीपॅड दुसऱ्या हाताने झाकून ठेवा. यामुळे तुमचा पिन नंबर कोणालाही कळू शकणार नाही.

लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते अनोळखी व्यक्तींची मदत घेतात. हे अजिबात करू नका. जर तुम्हाला एटीएममधून पैसे कसे काढायचे हे माहित नसेल, तर भाऊ, वडील, मूले किंवा तुमच्या घरातून ज्याला ते माहित असेल त्यांना घेऊन जा. याशिवाय जवळपास प्रत्येक एटीएममध्ये एक गार्ड असतो. तुम्ही गार्डची मदत घेऊ शकता, पण अनोळखी व्यक्तीची मदत कधीही घेऊ नका. एटीएममधून पैसे काढताना अनेकांना इतकी घाई असते की, पैसे हातात येताच ते मागे वळून पाहत नाहीत. हे करू नका. जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढता तेव्हा व्यवहार पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा आणि त्यानंतरच तेथून जा. ATM Transaction Alert

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.