अनिल देशमुख यांच्या वकीलासह सीबीआयच्या उपनिरीक्षकाला आज न्यायालयात केले जाणार हजर

author img

By

Published : Sep 4, 2021, 10:01 AM IST

सीबीआय

वकील तनवीर अहमद मीर यांनी त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उदाहरण दिले. सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात 24 तासामध्ये एफआयआर कॉपी देण्याचे आदेश दिले होते. त्यावर न्यायालयाने एफआयआर कॉपी आरोपीच्या वकिलाला देण्याची सूचना केली होती.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना आज (शनिवारी) रोझ एवेन्यू न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाने दोघांनाही 2 सप्टेंबरला दोन दिवसांकरिता सीबीआयच्या ताब्यात दिले होते.

2 सप्टेंबला सुनावणीत आनंद डागा यांच्यावतीने वकील तनवीर अहमद मीर यांनी अटकेचे प्राथमिक आरोपपत्र (एफआयआर) मागितले होते. जोपर्यंत एफआयआरची कॉपी मिळत नाही, तोपर्यंत आरोपाची माहिती कसे समजेल, असे वकील तनवीर अहमद मीर यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर सीबीआयने एफआयआरची कॉपी लवकरच दिली जाणार असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा-अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; पीएंविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

सुनावणीदरम्यान सीबीआयने म्हटले होते, की सर्च वारंट जारी केले आहे. ते गोपनीय कागदपत्रे आहेत. सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनी कागदपत्रे उघड केली आहेत. त्या बदल्यात त्यांनी लाच घेतली आहे. वकील तनवीर अहमद मीर यांनी त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उदाहरण दिले. सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात 24 तासामध्ये एफआयआर कॉपी देण्याचे आदेश दिले होते. त्यावर न्यायालयाने एफआयआर कॉपी आरोपीच्या वकिलाला देण्याची सूचना केली. तिवारी आणि डागा यांना 1 सप्टेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यावेळीही वकील मीर यांनी अटक वॉरंटची कॉपी मागितली होती.

हेही वाचा-100 कोटींची खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचिट ? सीबीआयकडून मोठा खुलासा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 18 ऑगस्टला अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच देशमुख यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणीही फेटाळून लावली होती.

हेही वाचा-अनिल देशमुखांचा चौकशी अहवाल लीक, वकिलासह सीबीआयच्या उपनिरीक्षकाला अटक

काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. वरळी सुखदा येथून सीबीआयाने त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गौरव चतुर्वेदी यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गरज पडल्यास चतुर्वेदी यांना पुन्हा हजर राहावे लागेल, अशा सूचना देखील सीबीआयने दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे गाडीतून जात असताना गाडी थांबवली आणि सीबीआयची टीम त्या दोघांना घेऊन गेली होती. काही दिवसांपूर्वी देशमुख प्रकरणातील सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाला होता. याच प्रकरणात सीबीआयने त्यांच्याच पथकातील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केल्याीची माहिती मिळत आहे. त्या अधिकाऱ्याचे नाव अभिषेक तिवारी असे असल्याचे समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.