CSK vs MI: मुंबईनंतर आता चेन्नई सुपर किंग्सही बाहेर! MI'कडून चेन्नईचा ५ गडी राखून पराभव

author img

By

Published : May 13, 2022, 7:02 AM IST

CSK vs MI

मुंबई इंडियन्सनंतर आता चेन्नई सुपर किंग्सही आयपीएल २०२२ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या ( CSK vs MI ) या सामन्यात मुंबईने चेन्नईचा ५ गडी राखून पराभव करत चेन्नईचा प्रवास संपवला.

आता फक्त सात संघ IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीत उरले आहेत, कारण मुंबई इंडियन्सनंतर चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास संपला आहे. चेन्नईचा 8वा पराभव झाला असून यासह एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. ( beat Chennai by 5 wickets ) अशा स्थितीत आता केवळ 7 संघ शिल्लक राहिले आहेत, जे प्लेऑफच्या उर्वरित तीन स्थानांसाठी लढतील. गुजरातपाठोपाठ लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचा क्रमांक लागतो ज्यांना प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या 59व्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. या मोसमातील मुंबईचा हा तिसरा विजय आहे, तर चेन्नईने 8 वा सामना गमावला आहे. चेन्नई आणि मुंबई हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत. ( Mumbai beat Chennai by 5 wickets ) या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरला, कारण चेन्नईला 100 धावाही करता आल्या नाहीत.


गतविजेत्या चेन्नईचा संपूर्ण संघ 16 षटकांत 97 धावा करत गारद झाला. CSK साठी कर्णधार एमएस धोनीने 33 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. ड्वेन ब्राव्होने 12 धावा आणि अंबाती रायडू आणि शिवम दुबेने 10-10 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. मुंबईकडून डॅनियल सॅम्सने तीन बळी घेतले, तर रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेयला प्रत्येकी दोन यश मिळाले.


त्याचवेळी 98 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही, कारण संघाने 34 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. मुंबईकडून तिलक वर्माने 34, कर्णधार रोहित शर्मा आणि हृतिक शोकीनने 18-18 धावा केल्या, तर टीम डेव्हिडने 16 धावा केल्या. मुंबईने हे लक्ष्य 14.5 षटकांत 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. चेन्नईकडून मुकेश चौधरीने 3 तर सिमरजीत सिंग आणि मोईन अलीने प्रत्येकी एक विकेट घेतली.


हेही वाचा - आमदार अकबरुद्दीन ओवेसीची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नवा वाद पेटण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.