Biryani Bill: अबब! रुग्णालयाच्या अधीक्षकांना बिर्याणीचे चक्क 3 लाखांचे बिल

author img

By

Published : May 15, 2022, 10:13 AM IST

रुग्णालय

बंगालमधील कटवा उपविभागीय रुग्णालयातही असाच एक प्रकार उघडकीस आला, जिथे नवनियुक्त अधीक्षकांना 3 लाखांचे बिर्याणीचे बिल देण्यात आले. ( Superintendent of a Hospital In West Bengal ) चौकशीत बिलावर स्वाक्षरी करणारे आरोग्य कर्मचारी दोषी आढळले. त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे अधीक्षकांनी सांगितले आहे.

कटवा - बंगालमधील कटवा उपविभागीय रुग्णालयातही असाच एक प्रकार उघडकीस आला, जिथे नवनियुक्त अधीक्षकांना 3 लाखांचे बिर्याणीचे बिल देण्यात आले. चौकशीत बिलावर स्वाक्षरी करणारे आरोग्य कर्मचारी दोषी आढळले. ( A bill of Rs 3 lakh for biryani ) त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे अधीक्षकांनी सांगितले आहे.

बिर्याणी निःसंशयपणे एक स्वादिष्ट पदार्थ आहे आणि बंगाली लोकांचे त्यावरील प्रेम कोणापासून लपलेले नाही. इथले लोक त्याच्या किमतीकडेही लक्ष देत नाहीत. पण त्याची किंमत 3 लाख रुपये असेल तर त्याचे आश्यर्य वाटणारच. अलीकडेच बंगालमधील कटवा उपविभागीय रुग्णालयात अशाच प्रकारची घटना समोर आली असून तेथे नवनियुक्त अधीक्षकांना 3 लाख बिर्याणीचे बिल देण्यात आले होते. एवढेच नाही तर हॉस्पिटलचे फर्निचर आणि फार्मसीचे बिलही तीन कोटींच्या वर होते.


अधीक्षक सौविक आलम यांना एकूण 81 बनावट नोटा देण्यात आल्या, त्यांना लवकरात लवकर पैसे देण्यास सांगण्यात आले. बिर्याणीचे बिल तीन लाख रुपये असल्याचे त्यांनी पाहिले. यासोबतच फर्निचर, फार्मसीसह इतर बिलेही भरायची होती. या प्रकरणात हेराफेरीचा संशय येताच अधीक्षकांनी बैठक घेऊन चर्चा केली. जिल्हा आरोग्य विभागाच्या सांगण्यावरून बनावट बिलांचा खेळ सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले. चौकशीत बिलावर स्वाक्षरी करणारे आरोग्य कर्मचारी दोषी आढळले. त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे अधीक्षकांनी सांगितले आहे.

या प्रकरणावर जिल्ह्याच्या अतिरिक्त आरोग्य अधिकारी सुवर्णा गोस्वामी यांनी सांगितले की, आम्हाला रुग्णालयात बनावट बिलांची तक्रार आली असून राज्य आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहेत. लवकरच, त्यांना अहवाल सादर करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल अस त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Gyanvapi Masjid: ज्ञानवापी मशीदीचे सर्वेक्षण! प्रत्येक कोपऱ्याचे सर्वेक्षण करण्याचे कोर्टाचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.