ETV Bharat / bharat

Heavy Rain In Rajasthan : राजस्थानमध्ये वादळी पावसाचा कहर, 14 जणांचा मृत्यू ; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

author img

By

Published : May 26, 2023, 4:55 PM IST

राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाने कहर केला आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या टोंक जिल्ह्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

Heavy Rain In Rajasthan
राजस्थानमध्ये वादळी पावसाचा कहर
राजस्थानमध्ये वादळी पावसाचा कहर

जयपूर : राजस्थानमध्ये वादळी पावसाने कहर केला आहे. पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केवळ टोंक जिल्ह्यातील 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वादळ आणि पावसाने राज्याची राजधानी जयपूर, टोंक, धौलपूर, भरतपूर आणि कोटा येथे कहर केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या वादळात सुमारे 50 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे कोटामध्ये 25000 KV लाईन बंद झाल्यानंतर रेल्वेमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती.

टोंक जिल्ह्यात 12 ठार : वादळाने टोंक जिल्ह्यात कहर केला आहे. जिल्हा मुख्यालयातील धन्ना तलाई भागात मदरशाची 10 फूट उंच भिंत कोसळून घरावर पडली. त्यामुळे घरात झोपलेले आजोबा, नातू आणि नातवाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. पावसामुळे टोंकमध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह जिल्हाभरात विविध अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर टोंक येथील सआदत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भीषण वादळामुळे डझनभर घरांच्या टिनाचे टपरी उडून गेले आहेत. गेल्या 12 तासांपासून वीज नाही. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

जयपूरमध्ये एकाचा मृत्यू : जयपूरमध्ये वादळाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे राजधानी जयपूरमध्ये अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी टिनाचे टपरी उडून गेले तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. वादळामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. जयपूरमध्ये मानसरोवर, दिल्ली रोड, आमेर आणि शहरासह इतर अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जयसिंग पुरा खोर पोलीस स्टेशन परिसरात नाईची थडी आणि पोलीस ठाण्याजवळची भिंत कोसळल्याने सुमारे 1 डझन लोक जखमी झाले. तर भिंतीखाली दबून एकाचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. आबिद असे मृताचे नाव आहे.

हवामान खात्याची सतर्कतेची सूचना : जयपूर हवामान केंद्राचे संचालक राधेश्याम शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या काही भागात गडगडाट आणि गारपिटीच्या बातम्या आल्या आहेत. शुक्रवारी राज्यातील सुमारे 18 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. अलवर, बरन, भरतपूर, बुंदी, डोसा, ढोलपूर, जयपूर, झुंझुनू, करौली, कोटा, सवाई माधोपूर, सीकर, टोंक, बिकानेर, चुरू, नागौर, श्रीगंगानगर या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.