SS Rajamouli announces Made in India : एसएस राजामौलींनी केली 'मेड इन इंडिया'ची घोषणा, बनवणार दादासाहोब फाळकेंचा बायोपिक
Published: Sep 19, 2023, 1:06 PM

SS Rajamouli announces Made in India : एसएस राजामौली यांनी भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. 'मेड इन इंडिया' असे शीर्षक असलेला चित्रपट भारतीय चित्रपटाची जन्मकथा रुपेरी पडद्यावर रंजकपणे सादर करेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत तर राजामौलींचा मुलगा एसएस कार्तिकेय चित्रपटाची निर्मिती करत आहे.
हैदराबाद - SS Rajamouli announces Made in India : बाहुबली, आरआरआर यासारख्या भव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ख्यातनाम दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. 'मेड इन इंडिया' असे शीर्षक असलेला हा भारतीय चित्रपटाच्या जन्माची रंजक कथा पडद्यावर साकारताना दिसेल.
एसएस राजामौली यांनी मंगळवारी जाहीर केले की, भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावरील बायोपिक मेड इन इंडिया बनवत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टने आपण खूप प्रभावित झाल्याचे राजामौलीने सांगितलं.
'जेव्हा मी या चित्रपटाची कथा ऐकली, तेव्हा त्या कथेनं मला भावनिकदृष्ट्या प्रवृत्त केलंय. बायोपिक बनवणे हे एक कठीण काम आहे पण त्याहून भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनका बद्दलची कल्पना करणे त्याहून अधिक आव्हानात्मक आहे. आमची टीम त्यासाठी तयार आहे. मेड इन इंडिया सादर करताना आम्हाला खूप अभिमानास्पद वाटत आहे,' असे एस एस राजामोली यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
राजामौली यांनी चित्रपटाची घोषणा करणारा एक टीझरही शेअर केलाय. या चित्रपटाचे वैशिष्ठ्य सांगताना भारतीय सिनेमाचा बायोपिक बनवत असल्याचे सांगतलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत. कक्कर यांनी यापूर्वी फिल्मिस्तान, मित्रॉन आणि जवानी जानेमन सारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटातून राजामोली यांचा मुलगा एसएस कार्तिकेय चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे. आरआरआर चित्रपटाचा लाईन प्रोड्यसर म्हणून त्यानं काम केलं होतं. एसएस कार्तिकेयनं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की, 'मला निर्माता बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. तो क्षण आता आला आहे. मेड इन इंडियाचं आव्हान अत्यंत जबाबदारीने पूर्ण करेन.'
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हे शीर्षक असलेला पूर्ण लांबीचा पहिला भारतीय चित्रपट बनवला होता. नाशिक जवळील त्र्यंबक येथे जन्मलेल्या या दादासाहेबांचे खरे नाव धुंडीराज गोविंद फाळके होते. यापूर्वी हरिश्चंद्राची फॅक्टरी हा मराठी चित्रपट यापूर्वी या विषयावर बनला होता. अनेक पुरस्कार मिळवलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आता एसएस राजामौलीमुळे ही कथा संपूर्ण देशात आणि विदेशात पोहोचू शकेल.
हेही वाचा -
३.Taapsee pannu shared pictures : तापसी पन्नूनं बॉयफ्रेंड मॅथियास बोएसोबतचे फोटो केली शेअर