Parineeti Chopra- Raghav Chaddha wedding: राघव चड्ढाशी लग्नापूर्वी परिणीती चोप्राच्या मुंबईतील घरावर रोषणाई
Published: Sep 19, 2023, 2:51 PM

Parineeti Chopra- Raghav Chaddha wedding: आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढासोबतच्या लग्नाआधी अभिनेत्री परिणीती चोप्राचे मुंबईतील घर रोषणाईने उजळून निघाले आहे. येत्या 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाह बंधनात बांधले जाणार आहेत.
मुंबई - Parineeti Chopra- Raghav Chaddha wedding: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या तयारीला जोरात सुरूवात झालीय. येत्या काही दिवसांत हे दोघे राजस्थानच्या उदयपूरमध्ये बोहल्यावर चढणार आहे. या लग्ना आधी परिणीतीचे मुंबईतील घरावर रोषणाई करण्यात आल्यानं तिचं घर दिव्यांच्या प्रकाशात उडळून निघालंय.
एका पापाराझीनं शेअर केलेल्या व्हिडिओ पोस्टमध्ये घराला करण्यात आलेली सजावट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा येत्या 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाह बंधनात बांधले जाणार आहेत. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओत राघवचे दिल्लीतील घरही सजवल्याचं दिसत होतं.
मिळालेल्या माहितीनुसार राघव चड्ढाच्या दिल्लीतील घरी पंजाबी पद्धतीने विवाहा अगोदरच्या पारंपरिक विधीांना सुरुवात झालीय. परिणीती आणि रावचे कुटुंबीय सध्या दिल्लीत राहात असून तिथून ते उदयपूरला दाखल होतील व तिथे शाही विवाह सोहळा पार पडेल. या सोहळ्याला परिणीतीची बहिण ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा अमेरिकेहून येणार आहे. परंतु तिचा पती निक जोनासचा दौरा सुरू असल्यामुळे तो या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं समजतं.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका अलीकडेच ऑनलाइन व्हायरल झाली होती. उदयपूरमधील लीला पॅलेस या ठिकाणी हा प्रतिष्ठीत शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी नवविवाहित जोडपे चंदीगडमध्ये लग्नाचं रिसेप्शन पार पडेल. या रिसेप्शनसाठी फिल्म इंडस्ट्री आणि राजकारणाच्या क्षेत्रातील मोठे सेलेब्रिटींना आमंत्रीत केले जाणार आहे.
13 मे रोजी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा नवी दिल्लीतील कपूरथला येथील घरात साखरपुडा पार पडला होता. या सोहळ्याला पंजाब आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह दिग्गज सेलेब्रिटी हजर होते. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आपल्या मुलीसह हजर झाली होती. त्याही प्रसंगी निक जोनास हजर राहू शकला नव्हता. या साखरपुड्याची भारतातील मीडियामध्ये भरपूर चर्चा झाली होती आणि याचे फोटोही व्हायरल झाले होते.
हेही वाचा -