महाराष्ट्र

maharashtra

Odisha Train Accident : रेल्वे अपघाताचे कारण समजले..केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 'त्या' यंत्रणेवर ठेवला ठपका

By

Published : Jun 4, 2023, 2:02 PM IST

Updated : Jun 4, 2023, 4:21 PM IST

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

शुक्रवारी ओडिशामधील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाला. यात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 पेक्षा जास्त जण यात जखमी झाले आहेत. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघात होण्या मागे काय कारण आहे, याची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 288 जणांचा बळी गेला. तर 1100 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात कशामुळे झाला याचा तपास केला जात होता. रेल्वे डब्ब्यांचे अवशेष बाजुला केल्यानंतर या अपघाताचे कारण आता समोर आले आहे. 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे हा अपघात झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

काय म्हणाले रेल्वे मंत्री : दरम्यान या प्रकरणी माहिती देताना रेल्वेमंत्र्यांनी या अपघातासाठी कोण जबाबदार आहे, याची ओळख पटल्याचेही सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग करताना जो बदल झाला, त्यामुळे हा अपघात झाला. हे कोणी केले आणि कसे घडले हे योग्य तपासानंतर कळेल, असेही रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही सिग्नल उपकरणाची व्यवस्था आहे. जे ट्रॅकच्या व्यवस्थेद्वारे ट्रेनमधील परस्परविरोधी हालचालींना प्रतिबंधित करत असते. हे मुळात अयोग्य क्रमाने सिग्नल बदलण्यापासून रोखण्यासाठी एक सुरक्षा उपाय आहे. या सिस्टीम अंतर्गत ट्रेनचा ट्रॅक निश्चित केला जातो. अपघात झाला त्या मार्गावरील रेल्वेमध्ये टक्करविरोधी कवच यंत्रणा नाही आहे. पण याचा आणि अपघाताचा काहीही संबंध नसल्याचे वैष्णव म्हणाले आहेत. दरम्यान आज पूर्ण रेल्वे रुळ मोकळा केला जाणार आहे. दोन मुख्य रेल्वे रुळ आहेत आणि दोन लूप लाइन आहेत. ते मोकले करण्याचे काम सुरू आहे. या रेल्वे रुळांचे बुधवारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल त्यानंतर या मार्गावरुन वाहतूक सुरू होणार असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले.

विरोधकांचे आरोप फेटाळले : दरम्यान सर्वात मोठा रेल्वे अपघात घडल्यामुळे विरोधी पक्षाकडून रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी रेल्वेमध्ये कवच या सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आला नव्हता, असा आरोप केला होता. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी अपघाताचे कारण सांगताना ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अपघाताशी कवचचा काही संबंध नाही. त्यांना जे समजले त्यानुसार त्यांनी तो आरोप केला असे रेल्वेमंत्री म्हणाले.

हेही वाचा -

  1. Odisha Road Accident: ओडिशातील रेल्वे अपघाताचे नेमके कारण काय?, रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी दिली माहिती
  2. Odisha Train Accident: रेल्वे अपघातावरुन राजकारण तापले, रणदीप सुरजेवालांनी पंतप्रधान मोदींना विचारले 9 प्रश्न
Last Updated :Jun 4, 2023, 4:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details