महाराष्ट्र

maharashtra

Odisha Train Accident: रजेवर असलेल्या एनडीआरएफच्या जवानाने सर्वात प्रथम केले होते अलर्ट, लाईव्ह लोकेशनने पथकाला झाली मदत

By

Published : Jun 4, 2023, 11:53 AM IST

Odisha Train Accide

बालासोर रेल्वे अपघातात सर्वात प्रथम एनडीआरएफला अलर्ट हे रजेवर असलेल्या एनडीआरएफ जवानाना पाठविला होता. या अलर्टमुळेच एनडीआरएफला वेळीत घटनास्थळी लाईव्ह लोकशेनद्वारा पोहोचणे शक्य झाले. या घटनेने जवान हा सुट्टीवर असला तरी तो कायम देशाच्या सेवेत असतो, हे दिसून आले आहे.

भुवनेश्वर : शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस हे रुळावरून घसरल्यानंतर थांबलेल्या मालगाडीला धडकली. या अपघात ट्रॅकवर रेल्वे डबे कोसळले असताना दुसरी पॅसेंजर ट्रेन - बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसने धडक दिली. या तिहेरी रेल्वे अपघातात किमान २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११०० हून अधिक प्रवासा जखमी झाले आहेत. वेळीच एनडीआरएफचे पथक आल्याने अनेकांची सुटका करण्यात आली.

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे (NDRF) जवान व्यंकटेश सुट्टीसाठी पश्चिम बंगालमधील हावडा येथून तामिळनाडूला घरी जात होते. एसी कोच बी-7 असताना त्यांचा रेल्वे डबा रुळावरून घसरला. मात्र, पुढील डब्यांशी धडकला नसल्याने ते सुखरुप राहिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कोलकाता येथील एनडीआरएफच्या दुसऱ्या बटालियनमध्ये तैनात असलेल्या 39 वर्षीय व्यंकटेश यांना रेल्वेच्या अपघाताची तीव्रता जाणवली. तेव्हा त्यांना तातडीने प्रथम बटालियनमधील वरिष्ठ निरीक्षकांना अपघाताची माहिती दिली.

जवानाने प्रवाशांना वाचविण्यासाठी केली धडपड:घटनास्थळी पथकाला पोहोचणे सुलभ व्हावे याकरिता काही फोटो आणि लाईव्ह लोकेशन त्यांनी व्हॉट्सअपवरून एनडीआरएफच्या कंट्रोल रुमला पाठविले. याचाच वापर करून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफचे जवान व्यकंटेश म्हणाले, की अपघातात मला मोठा धक्का बसला. काही वेळात काही प्रवासी खाली पडताना दिसले. तातडीने पहिल्या प्रवाशाला बाहेर काढून रेल्वे ट्रॅकजवळील दुकानात बसले. त्यानंतर अपघातात अडकेल्या इतरांच्या मदतीसाठी धावलो. जखमी आणि अडकलेल्या प्रवाशांना शोधताना अंधाराचा अडथळा होता. मदतीचे प्रयत्न करताना मोबाईलच्या टॉर्चचा वापर केला. प्रवाशांना डब्यातून बाहेर काढत सुरक्षित स्थळी नेले.

जवान नेहमीच ड्युटीवर असतो-स्थानिक लोकांनी अपघातामध्ये अडकलेल्या लोकांना सर्व प्रकारे मदत केली. दिल्लीतील एनडीआरएफचे डीआयजी मोहसेन शाहेदी यांनी सांगितले की, एनडीआरएफचा जवानाने गणवेश घातला असो की नसो, तो नेहमीच कर्तव्य बजाविण्यासाठी तत्पर असतो. शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास झालेल्या अपघातानंतर एनडीआरएफ आणि ओडिशा राज्याच्या बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे एक तास लागला.

गोल्डन अवरमध्ये उपचार करण्याची गरज-एनडीआरएफने गोल्डन अवरमध्ये प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. गोल्डन अवरमध्यये त्वरित वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया उपचार मिळाले तर व्यक्तीचा मृत्यू टाळण्याची सर्वाधिक शक्यता असते. एकप्रकारे गोल्डन अवरमध्ये मदत मिळणे म्हणजे जीवदान मिळणे असते. त्यामुळे एनडीआरएफसारख्या बचाव पथकाची मदत ही अपघातामध्ये महत्त्वाची ठरली आहे.

हेही वाचा-

  1. Odisha Train Accident: रेल्वे रुळावरील ट्रेनचे अवशेष हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; 90 ट्रेन रद्द
  2. Odisha Train Accident: रेल्वे अपघातावरुन राजकारण तापले, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालाने पंतप्रधान मोदींना विचारले 9 प्रश्न

ABOUT THE AUTHOR

...view details