महाराष्ट्र

maharashtra

Odisha Train Accident: रेल्वे अपघातावरुन राजकारण तापले,  रणदीप सुरजेवालांनी पंतप्रधान मोदींना विचारले 9 प्रश्न

By

Published : Jun 4, 2023, 11:28 AM IST

Updated : Jun 4, 2023, 12:44 PM IST

रणदीप सुरजेवाला यांचे पीएम मोदींना प्रश्न

ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या अपघाताप्रकरणावरुन देशातील राजकारण तापले आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अपघातप्रकरणी काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींना 9 प्रश्न केले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी तिहेरी रेल्वे अपघातावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बालासोरमध्ये झालेल्या अपघातावरुन आता देशातील राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शनिवारी अपघातस्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना या अपघातावरुन 9 प्रश्न विचारली आहेत.

रणदीप सुरजेवाला याचे आरोप करणारे ट्विट : ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल देण्यात आला आहे. यात बालासोर येथे झालेला अपघात हा सिग्नलिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आले. परंतु रेल्वेमंत्री आणि रेल्वे मंत्रालयाने सिग्नलिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याच्या गंभीर इशाऱ्यापासून बचाव केला होता. दरम्यान दक्षिण पश्चिम रेल्वे झोनचे मुख्य परिचालन व्यवस्थापक यांनी 9 फेब्रुवारी 2023 रोजी सिग्नल यंत्रणेविषयी माहिती दिली होती. व्यवस्थापकानुसार, सिग्नल सिस्टीमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे सांगितले. SMS पॅनेलमधील मार्गात रेल्वेचा मार्ग वेगळा दिसतो. रेल्वे योग्य सिग्नलवर दिसत असली तरी रेल्वे प्रवासा सुरुवात केली का ती रेल्वेचा मार्ग बदलल्याची सिग्नल त्या पॅनेलवर दिसत असतो. हे इंटरलॉकिंगचे सार आणि मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करते',असा दावा काँग्रेस नेत्याने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. सिग्नल मेंटेनन्स व्यवस्थेचे निरीक्षण करून ती तत्काळ दुरुस्त केली नाही तर पुन्हा असा गंभीर अपघात होऊ शकतो, असा इशाराही सुरजेवाला यांनी या ट्विटमधून दिला आहे.

पंतप्रधान मोदींची झोप उडवणारे सुरजेवाला यांचे प्रश्न :

  1. सिग्नल "पुन्हा घडणे आणि गंभीर अपघात" होऊ शकतात, असा इशाराही सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये दिला आहे. रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंत्रालयाने बचाव का केला आणि इतका निष्काळजीपणा का केला असा प्रश्नही सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
  2. सुरजेवाला पुढे म्हणाले, "अलीकडेच अनेक मालगाड्या रुळावरून घसरल्या. ज्यात अनेक लोको पायलट मरण पावले आणि वॅगन्स नष्ट झाल्या. रेल्वे सुरक्षेच्या अभावावर पुरेसे लक्ष देण्यात मंत्री आणि रेल्वे मंत्रालयाला कमी पडले का?
  3. या प्रश्नानंतर सुरजेवाला यांनी आणखी एक प्रश्न मोदी सरकारला केला आहे. "रेल्वे मंत्री रेल्वे सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मार्केटिंग आणि पंतप्रधानांना खूश करण्यासाठी अधिक चिंतित आहेत हे योग्य आहे का?
  4. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या कामाकडे पाहण्यापेक्षा पंतप्रधानांच्या हस्ते वंदे भारत ट्रेन्स लाँच करण्यात. तसेच रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करण्यात (त्यांची छायाचित्रे ट्विट करून) आणि महसूल वाढवण्यात रेल्वे मंत्री खूप व्यस्त आहेत का?"
  5. "हेच कारण आहे का, की रेल्वेमंत्र्यांनी 2 जून 2023 रोजी चिंतन शिबिरात (#OdishaTrainAccident च्या काही तास आधी) रेल्वे सुरक्षेवरील सादरीकरण टाळले आणि वंदे भारत ट्रेन्स सुरू करण्यावर आणि महसूल वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले.
  6. आवश्यक मानवी संसाधनांच्या अभावामुळे - गँग मॅन, स्टेशन मास्टर्स, लोको पायलट इत्यादी यांची कमी उपलब्धतेमुळे रेल्वेच्या सुरक्षेत त्रुटी राहिली का?
  7. रणदीप सुरजेवाला यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीचा आधार घेतला. इतर प्रश्नाप्रमाणे प्रश्न करताना सुरजेवाला म्हणाले, माहितीच्या अधिकारात रेल्वेने दिलेल्या उत्तरानुसार 39 रेल्वे झोनपैकी बहुतांश भागात आवश्यक मनुष्यबळाची कमतरता आहे हे बरोबर नाही का
  8. रेल्वेमध्ये गट क ची ३ लाख 11 हजार पदे रिक्त आहेत, त्यामुळे रेल्वे सुरक्षा तसेच परिचालन कार्यावर परिणाम होत आहे, त्यामुळे ते धोक्यात आले आहे बरोबर नाही का?
  9. रेल्वेमध्ये 18,881 राजपत्रित संवर्गातील 3,081 पदे रिक्त आहेत हे बरोबर आहे का ? असे प्रश्न सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींना विचारले आहेत.

हेही वाचा -

  1. Odisha Train Accident: एनडीआरएफने अपघातग्रस्त रेल्वेच्या डब्ब्यातून प्रवाशांचा शोध घेण्याकरिता वापरले उच्च तंत्रज्ञान
  2. Odisha Train Accident: रेल्वे रुळावरील ट्रेनचे अवशेष हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; 90 ट्रेन रद्द
Last Updated :Jun 4, 2023, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details