ETV Bharat / state

श्रीकांत शिंदेंच्या प्रचारात फटाक्यामुळं भाजली आज्जी; दोनशे रुपये बेतले जीवावर - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 7:26 PM IST

Updated : May 11, 2024, 8:21 PM IST

Lok Sabha Election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी गेलेल्या एक 70 वर्षीय महिला फटाक्यामुळं भाजली आहे. प्रचार यात्रेत उडवलेल्या फटाक्यामुळं भाजलेली महिला गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र, तिची दखल घ्यायला कुणीही तयार नसल्याचं तिचं म्हणणं आहे.

Shrikant Shinde
श्रीकांत शिंदे (ETV Bharat Maharashtra Desk)

मुंबई Lok Sabha Election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन मे रोजी उल्हासनगरमधील अन्नपूर्णा शिरसाट नावाची एक महिला श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचार यात्रेत सहभागी झाली होती. यासाठी तिला दोनशे रुपये मिळणार होते. मात्र, या प्रचार यात्रेदरम्यान फटाके फोडण्यात आले. यावेळी तिच्या साडीवर एक फटाका येऊन पडला. त्यानंतर महिलेच्या साडीनं पेट घेतला. दोनशे रुपयांच्या मोहापायी प्रचार यात्रेत सामील झालेल्या या महिलेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिच्यावर कोणतेही प्राथमिक उपचार न करता महिलेला घरी पाठवण्यात आलं. त्यानंतर तिला धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र, पुढं कुणीही माझ्याकडं लक्ष दिलं नसल्याचा आरोप महिलेने केलाय. त्यानंतर सदर महिला स्वतः सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाली.

उपचार मिळण्यास टाळाटाळ : सिव्हिल रुग्णालयातही दाखल झाल्यानंतर माझ्यावर योग्य उपचार झाले नाहीत. या अवस्थेला जबाबदार असलेल्या कुठल्याही नेत्यानं माझी साधी भेटही घेतली नाही. प्रचार यात्रेमध्ये महिला कार्यकर्त्या प्रचारासाठी घेऊन गेल्या होत्या. तिनंसुद्धा लक्ष न दिल्याचा आरोप महिलेनं केलाय. या संदर्भात सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला तेव्हा, सदर महिलेच्या उपचारासाठीची अनामत रक्कम अद्यापही कोणी जमा केली नसल्याचं आढळून आलं.

दोनशे रुपये जीवावर बेतले : याबाबत अन्नपूर्णा शिरसाट यांचा मुलगा म्हणाला की, "आईला जखमी अवस्थेत धन्वंतरी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिची विचारपूस करण्यासाठी कोणीही आलं नाही. आम्हाला तिथला खर्च झेपला नसता म्हणून आम्ही सिव्हिल रुग्णालयामध्ये आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू असताना एका मुलीला त्यांनी रुग्णालयात ताबडतोब दाखल केल्याच्या बातम्या येतात. मात्र, श्रीकांत शिंदे यांच्याच प्रचार यात्रेतील एका सत्तर वर्षाच्या महिलेला फटाक्यांमुळं इजा झाल्यावर तिच्याकडं कोणी लक्ष देत नाहीय." फक्त दोनशे रुपयांसाठी प्रचार यात्रेत सहभागी झाल्यानं अन्नपूर्णा शिरसाट यांच्या जीवावर बेतल्याचं त्यांच्या मुलानं सांगितलं.

दरम्यान, वरील सर्व आरोप हे जखमी महिलेने केलेले आहेत.

हे वाचलंत का :

  1. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी खोदले जाणार सहा फुट खोलीचं खंदक; कारण काय? - lok sabha election
  2. संभाजीनगरात 'मशाल' अन् 'धनुष्यबाणात' तुफान राडा ; दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Lok Sabha Election 2024
  3. मणिपूरमधील 'शबरीं'चा अपमान झाला, तेव्हा पंतप्रधान चूप का, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
Last Updated : May 11, 2024, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.